सुरू होणार हास्याचा नवीन अध्याय; ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा टीझर प्रदर्शित, हास्यजत्रामधील अभिनेत्री सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

Latest Hasyajatra news |
सुरू होणार हास्याचा नवीन अध्याय; ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा टीझर प्रदर्शित, हास्यजत्रामधील अभिनेत्री सूत्रसंचालकाच्या भूमिकेत
Updated on

एव्हरेस्ट एंटरटेनमेंटने नुकतीच ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ या नव्या मराठी स्टँडअप कॉमेडी शोची घोषणा केली होती. आता ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे. नुकतीच याची पहिली झलक एका कार्यक्रमात सादर करण्यात आली.

‘ऑलमोस्ट कॉमेडी’मध्ये, लेखक चेतन डांगे, अमोल पाटील, चिन्मय कुलकर्णी, अक्षय जोशी आणि ऋषिकांत राऊत हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील काही दिग्गज लेखक, प्रत्यक्ष स्टेजवर येऊन प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. याआधी त्यांच्या लेखणीतून साकारलेली हास्यनिर्मिती आपण पाहिली आहे, आता त्यांचा स्टेजवरील धमाकेदार परफॉर्मन्स प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणणार आहे. आपल्या दिलखेच अंदाजात सूत्रसंचलन करून अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर या शोची रंगत वाढवणार!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com