
'होणार सून मी या घरची' मधून घराघरात लोकप्रिय ठरलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकली. तिने अग्गबाई सासूबाई' आणि 'प्रेमाची गोष्ट' या मालिकांमध्येही आपली छाप पाडली. मात्र प्रेमाची गोष्ट' या मालिकेमधून ती अर्ध्यावरच बाहेर पडली. अशातच नुकताच तिच्या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झालाय. ती सुबोध भावेसोबत झी मराठीवर दिसणार आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' असं या मालिकेचं नाव आहे. मात्र यापूर्वी तेजश्रीने एका बॉलिवूड अभिनेत्यासोबत किसिंग सीनदेखील देखील होते.