
छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ती 'होणार सून मी या घरची' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.आपल्या पहिल्याच मालिकेदरम्यान ती आणि अभिनेता शशांक केतकर एकमेकांच्या प्रेमात पडले. मालिकेत एकमेकांचे साथीदार असलेले हे दोघे खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे सोबती बनले. 8 फेब्रुवारी 2014 मध्ये शशांक आणि तेजश्रीने पुण्यात लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर त्यांच्यात मतभेद झाले आणि त्यांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर काहीच वर्षात शशांकने पुन्हा लग्न केलं.