
छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यातील काही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या तर काही अजूनही टीआरपीसाठी मेहनत करताना दिसतायत. अशातच झी मराठीने काही नवीन मालिकांची घोषणा केली. त्यात 'तारिनी' ही मालिका आहे. तिच्यासोबतच झी मराठीवर लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान नव्या मालिकेत दिसणार आहे. तिच्या 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतायत. अशातच तेजश्रीने तिचा शूटिंगचा अनुभव सांगितलाय. एका सीनने तेजश्रीची झोप उडवली होती. कोणता होता तो सीन?