

TEJASHREE PRADHAN ON SECOND MARRIAGE
ESAKAL
'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान प्रेक्षकांच्या गळयातील ताईत आहे. तिच्या चाहत्यांची संख्या प्रचंड आहे. सध्या सगळीकडे तेजश्रीच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा आहे. तिने पहिलं लग्न अभिनेता शशांक केतकर याच्याशी केलेलं. मात्र २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आता तब्बल ११ वर्षांनी ती दुसऱ्या लग्नाबद्दल मोकळेपणाने बोलली आहे. आपल्याला लग्न करायचं असल्याचं तिने सांगितलं. मात्र यापूर्वी दिलेल्या मुलाखतीत तिने तिला कसा नवरा हवाय याबद्दल सांगितलं होतं.