
मराठी मालिकेमधील टॉपची अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिने 'होणार सून मी या घरची' मधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. तिच्या जान्हवी या भूमिकेने तिला प्रचंड ओळख मिळवून दिली. त्यानंतर ती ज्या मालिकांमध्ये दिसली त्या मालिकाही हिट ठरल्या. 'अग्गबाई सासूबाई' असो किंवा 'प्रेमाची गोष्ट' असो या मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. मात्र तिने अचानकच 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका सोडली. त्यामुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. तिने ही मालिका का सोडली यामागचं कारण समजू शकलेलं नाही. मात्र आता तेजश्री पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे.