
छोट्या पडद्यावर लवकरच काही नवीन मालिका भेटीला येणार आहेत. त्यातही प्रेक्षक त्यांच्या लाडक्या तेजूला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ती लवकरच झी मराठीवरील 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेतून भेटीला येणार आहे. त्यात या मालिकेत तेजश्री एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षक तिच्या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच तेजश्रीने प्रेक्षकांना एक खास सरप्राइज दिलं आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी तेजश्रीची झी मराठीच्या वेगळ्या मालिकेत जबरदस्त एंट्री झाली आहे.