
मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिने स्वतःच्या हिमतीवर मराठी सिनेसृष्टीत नाव कमावलं. वेगवेगळ्या भूमिका साकारत तिने प्रेक्षकांना आपलंसं केलं. तिने अनेक चित्रपट आणि काही मालिकांमध्येही काम केलं. सध्या तेजस्विनी 'ये रे ये रे पैसा ३' साठी चर्चेत आहे. या सिनेमाचं ती जोरदार प्रमोशन करताना दिसतेय. तिने अशाच एका मुलाखतीत तिच्या वडिलांच्या पत्राबद्दल सांगितलं आहे. त्यात तिच्या दिवंगत वडिलांनी बरंच काही लिहिलेलं होतं.