
ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले. मराठी चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीला त्यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. ज्योती या 'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या. त्या प्रेक्षकांच्या लाडक्या पुर्णा आजी होत्या. आता त्या पुन्हा कधीही पडद्यावर दिसणार नाहीत. प्रेक्षकांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. त्यांचं निधन पुण्यात झालं. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही .
त्या ६८ वर्षांच्या होत्या. गेल्या ३-४ दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण अखेर आज त्यांची दुपारी ४च्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानगृहात अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.