नागा चैतन्य आणि साई पल्लवी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘थांडेल’ सध्या जोरदार चर्चेत आहे. हा चित्रपट 7 फेब्रुवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार असून, चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. अॅक्शन आणि भावनिक नाट्याचा परिपूर्ण मिलाफ असलेल्या या चित्रपटाचं संगीतसुद्धा प्रेक्षकांसाठी मुख्य आकर्षण आहे.