
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मलिक 'ठरलं तर मग' प्रेक्षकांची आवडती आहे. त्यातली सायली आणि अर्जुनची जोडीही प्रेक्षकांची लाडकी आहे. नुकताच स्टार प्रवाहने 'माउली महाराष्ट्राची' निमित्ताने प्रेक्षकांना घरबसल्या वारीचा आनंद मिळवून देण्याचा अनोखा उपक्रम हाती घेतला. या कार्यक्रमात प्रेक्षकांचा लाडका अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीदेखील सहभागी झाला होता. आता त्याने वारीतला त्याचा अनुभव सांगितलाय.