
टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर वर्चस्व गाजवणाऱ्या 'ठरलं तर मग' या मालिकेचा सगळीकडे बोलबाला आहे. ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. 'ठरल तर मग' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलंय. या मालिकेत दिवसेंदिवस निरनिराळे ट्विस्ट येत आहेत जे पाहून प्रेक्षकही खुश झालेत. अर्जुनकडे आता वात्सल्य आश्रम केसमध्ये फक्त काही दिवस उरलेत. आता यात तो साक्षीच्या विरोधात पुरावे गोळा करतोय. आणि त्याच्या हाताला लागलेला एक मोठा पुरावा आता तो कोर्टात सादर करणार आहे.