
‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेतील पूर्णा आजी या जगातून गेल्या आहेत
अजूनही चाहत्यांना विश्वास बसत नाहीये, हसत्या-बोलत्या आजी आपल्याला सोडून गेल्यात
अभिनेत्री ज्योती चांदेकर यांनी निधनाआधी प्रेक्षकांची 'ती' इच्छा पूर्ण केलीच
Tharala Tar Mag Purna Aaji Death : ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेतील पूर्णा आजी म्हणजेच अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे आजारपणामुळे निधन झाले आहे. ही धक्कादायक बातमी समोर येताच मालिकेच्या कलाकारांसह प्रेक्षकांनाही मोठा धक्का बसला. ज्योती चांदेकर यांनी साकारलेल्या पूर्णा आजीच्या कणखर पण प्रेमळ व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली होती. त्यांच्या अचानक जाण्याने मालिकेत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.