
'ठरलं तर मग' मालिका ही मालिका सध्या छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. टीआरपी याची पहिल्या क्रमांकावर असणारी ही मालिका असून गेली दोन वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. यातील सायली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. सध्या मालिकेत अर्जुन मधुभाऊंच्या केसमध्ये प्रगती करताना दिसतोय. अशातच मालिकेत एक पत्रकार परिषद दाखवण्यात आली होती. मात्र आता नेटकऱ्यांनी या पत्रकार परिषदेतील चूक दाखवली आहे.