
monika dabade
esakal
सध्या सगळीकडे दिवाळीची धामधूम आहे. दिवाळीच्या निमित्ताने अनेक कलाकार चाहत्यांना शुभेच्छा देताना दिसतात. नुकतीच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने तिच्या लेकीचा चेहरा दाखवला. दुआला पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता दीपिका पाठोपाठ छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मधील अभिनेत्रीने देखील तिच्या लेकीचा चेहरा प्रेक्षकांना दाखवला आहे. मालिकेतील अर्जुनची बहीण अस्मिता म्हणजेच अभिनेत्री मोनिका दबडे हिने तिच्या मुलीचा चेहरा दाखवला आहे.