

'ठरलं तर मग' ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर जादू केलीये. त्यात सायली आणि अर्जुन यांची जोडीही प्रेक्षकांना प्रचंड आवडते. टीआरपीमध्ये कायम टॉपला असणाऱ्या या मालिकेतील एक कलाकार सध्या मालिकेतून गायब आहे. ती सध्या मॅटर्निटी लिव्हवर आहे. ही अभिनेत्री आहे मोनिका दबडे. मोनिका मालिकेत अस्मिताच्या भूमिकेत दिसते. मोनिका महिन्याभरापूर्वीच आई झाली. आता तिने तिच्या बाळासाठी एक खास पोस्ट शेअर केलीये.