
चांगल्या घरातल्या मुली फिल्म इंडस्ट्रीमध्ये जात नाहीत. ही इंडस्ट्री खराब आहे, असं म्हटलं जातं. मात्र आता हे चित्र हळूहळू बदलू लागलंय. आजवर इथे अनेक अभिनेत्रींनी कास्टिंग काऊचचा सामना केलाय. अभिनेत्री नाही तर अभिनेत्यांनादेखील इथे असाच अनुभव आलाय. आता फिल्म इंडस्ट्रीमधील काही लोकांचा खरा चेहरा एका अभिनेत्रीने समोर आणला. अभिनेत्री प्राची पिसाट हिला अभिनेता सुदेश म्हशिलकरने मेसेज करून थेट फ्लर्ट करू करायचं असल्याचं सांगितलं. ज्याचा स्क्रिनशॉट तिने व्हायरल केला. आता त्यानंतर अभिनेत्रीला अनेक अभिनेत्रीचा पाठिंबा मिळत आहे.