

गेले वर्षभर ज्या मालिकेने टीआरपी यादीत पहिला क्रमांक कायम ठेवलाय ती म्हणजे 'ठरलं तर मग'. या मालिकेने अक्षरशः प्रेक्षकांच्या मनावर जादू केलीये. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलंय. मालिकेतील सायली आणि अर्जुनाची जोडीही प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. मात्र आता ही जोडी वेगळी होणार आहे. कारण मालिकेत आता नवा ट्विस्ट येणार आहे. कल्पना तिच्या लाडक्या सुनेला घराबाहेर काढणार आहे. हा भाग १२ डिसेंबर रोजी दाखवण्यात येण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी मालिकेचा प्रोमो व्हायरल झालाय.