
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' प्रचंड लोकप्रिय आहे. गेले कित्येक महिने ही मालिका टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडीही प्रेक्षकांची आवडती आहे. सध्या मालिकेत प्रिया, महीपत आणि साक्षी मिळून सगळ्यांना फसवत आहेत. मात्र आता अर्जुन लवकरच सगळं सत्य समोर आणेल असं दिसतंय. कारण अर्जुनच्या हातात एक मोठा पुरावा लागला आहे. यातून महीपतचा या केसशी संबंध आहे हे स्पष्ट झालं. असा नेमका काय पुरावा भेटलाय अर्जुनला?