

tharla tar mag fame chaitanya father
esakal
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असते. या मालिकेतलं पात्रही प्रेक्षकांच्या आवडीची आहेत. या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरलाय. त्यातीलच एक कलाकार म्हणजे अभिनेता चैतन्य सरदेशपांडे. म्हणजेच मालिकेतील अर्जुनचा मित्र चैतन्य. आता चैतन्यचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. कारण हा व्हिडिओ त्याच्या वडिलांचा आहे. चैतन्यचे वडील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम' या चित्रपटात झळकले आहेत.