
गेल्या काही महिन्यात अनेक मराठी कलाकारांनी आपल्या नवीन व्यवसायाचा शुभारंभ केला. कुणी दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला. तर कुणी स्वतःचं हॉटेल सुरू केलं. आता त्यात आणखी एका अभिनेत्याचं नाव जोडलं गेलंय. मात्र या अभिनेत्याने अनोखा व्यवसाय सुरू करून सगळ्यांचं मन जिंकलंय. त्याने कोणतंही हॉटेल वगरे सुरू केलेलं नाही. तर त्याने शेतकऱ्यांच्या शेतीला पूरक असा व्यवसाय सुरू केलाय. स्वतः शेती करता करता या कलाकाराने स्वतःचा सेंद्रिय खताचा व्यवसाय सुरू केलाय. चांगलं खात शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल याकडे त्याचा कल आहे. हा अभिनेता आहे 'ठरलं तर मग' मधील मयूर खांडगे.