Tharal Tar Mag: 'ठरलं तर मग' मालिकेत सर्वात मोठा ट्विस्ट, अखेर पूर्णा आजी करणार सायलीचा स्वीकार

Tharla Tar Mag New Twist: आता मालिकेत नवा सर्वात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
tharla tar mag
tharla tar mag sakal

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'ठरलं तर मग' ही मालिका अगदी सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतेय. मालिकेची कथा आणि कलाकार या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. म्हणूनच सातत्याने ही मालिका वाहिनीवरील सगळ्यात जास्त पसंत केली जाणारी मालिका ठरतेय. अर्जुन आणि सायलीचं नातं मालिकेत कसं खुलत जातं हे आत्तापर्यंत पाहायला मिळालं होतं. मात्र आता मालिकेत नवा सर्वात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

या मालिकेत पूर्णा आजी आणि सायली यांच्यातलं नातं देखील वेगळं दाखवलय. एकीकडे सायली पूर्णा आजीवर प्रेम करते, त्यांचा आदर करते तर दुसरीकडे पूर्णा आजीच्या मनात सायली अजूनही घर करु शकलेली नाहीय. यातच मालिकेतला नवा ट्विस्ट प्रेक्षकांना सुखावणारा असेल.

गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतने वाट पहातोय तो भावनिक क्षण लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. येत्या ८ जुलैच्या विशेष भागात प्रेक्षकांना हा खास क्षण पाहायला मिळणार आहे. या विशेष भागातपूर्णा आजी सायलीला नातसून म्हणून स्वीकारणार असून मालिकेतलं हे अत्यंत महत्त्वाचं वळण आहे.

खरतर सायलीने आपल्या प्रेमळ आणि समंजस स्वभावाने सर्वांचच मन जिंकलं. सायलीच्या निरागस स्वभावाच्या अर्जुनही प्रेमात पडला. पूर्णाआजीचं मतपरिवर्तन व्हायला मात्र खूप वाट पहावी लागली. अनेक प्रसंगांमध्ये पूर्णाआजीला सायलीमध्ये तिच्या लाडक्या प्रतिमाचा भास व्हायचा. मात्र तरीही तिने सायलीला नातसूनेचा दर्जा कधीच दिला नाही. आता मात्र पूर्णा आजीला आपल्या चुकीची जाणीव झालीय. संपूर्ण कुटुंबासमोर सायलीची माफी मागून पूर्णा आजी घराची जबाबदारी सायलीवर सोपवणार आहे. मालिकेतला हा हळवा क्षण विशेष भागात पाहायला मिळणार आहे. मात्र सायली - अर्जुनच्या नात्याचं सत्य समोर आल्यावर पूर्णा आजी कश्या व्यक्त होतील हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल.

अभिनेता अमित भानुशालीला अर्जुनच्या भूमिकेत प्रेक्षकांची पसंती मिळाली तर अभिनेत्री जुई गडकरीला सायलीच्या भूमिकेत प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. या सगळ्यात मालिकेतील इतर पात्रही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पूर्णा आजीच्या भूमिकेत अभिनेत्री ज्योती पंडितही सगळ्यांची मनं जिंकताना दिसत आहेत. अल्पावधीतच ही मालिका घराघरात पोहोचली आणि प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली. त्यामुळे या मालिकेत येणारे विविध ट्विस्ट प्रेक्षकांसाठी कायम उत्कंठावर्धक ठरतात.

tharla tar mag
Shatrughan Sinha करणार होते चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी..देवआनंद असं काय बोलले की एका क्षणात बदललेला निर्णय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com