
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं ता मग' मध्ये आता वेगवेगळे ट्विस्ट येत आहेत. यापूर्वी अर्जुनने वात्सल्य आश्रम केसमध्ये मधुभाऊंची निर्दोष सुटका केली. साक्षी आणि प्रिया या दोघींनाही त्याने खडी फोडायला पाठवलं. साक्षीवरचा खुनाचा आरोप सिद्ध झाल्याने त्या दोघीही आता एकाच सेल मध्ये बंद आहेत. कालच्या 'ठरलं तर मग' च्या भागात प्रिया आणि सखी यांच्यात एक सीन दाखवलाय जो पाहून प्रेक्षकांना हसू अनावर झालंय. यात चक्क जेलमध्ये प्रिया आणि साक्षी यांच्यात मारामारी होताना दाखवलीये. हा सीन पाहून प्रेक्षक हसून बेजार झालेत. यावर प्रेक्षकांनी अनेक कमेंट देखील केल्यात