
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' प्रेक्षकांची आवडती आहे. मालिकेतील अर्जुन आणि सायलीची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. गेले कित्येक महिने ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तर टीआरपी यादीतही मालिकेने आपलं स्थान सोडलेलं नाही. ती टॉप ५ मध्ये कायम आहे. मात्र मालिकेत सध्या सुरू असलेल्या कथेमुळे नेटकरी चांगलेच वैतागले आहेत. मालिकेत पुन्हा एकदा अर्जुन आणि दामिनी आमनेसामने येणार आहेत. मात्र दामिनीचा डाव अर्जुन तिच्यावरच उलटवणार आहे.