
स्टार प्रवाहावरील मालिका या प्रेक्षकांच्या गळ्यातला ताइत बनल्या आहेत. त्यात 'ठरलं तर मग' मालिकेने गेली २ वर्ष सगळ्या मालिकांना मागे टाकत टीआरपीमध्ये आपलं स्थान कायम राखलं आहे. ही मालिका प्रेक्षकांनाही प्रचंड आवडते. मात्र जेव्हा मालिकेत तोच तोचपणा येतो तेव्हा प्रेक्षक मालिकेवर टीकाही करतात. या मालिकेतसध्या निरनिराळे ट्विस्ट येत आहेत. मात्र आता सुभेदाराच्या घरात दोन्ही सुनांची जोरदार भांडणं होणार आहेत. जी पाहून नेटकऱ्यांसोबत सगळ्या सुभेदारांनादेखील धक्का बसणार आहे.