प्रेक्षक ज्याची वाट पाहत होते तेच घडणार; समोर येणार प्रिया तन्वी नसण्याचं सत्य; 'ठरलं तर मग'मध्ये मोठा ट्विस्ट!

Tharala Tar Mag Today Episode: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मध्ये आता सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. प्रियाच्या विरोधातला पहिला पुरावा अर्जुन आणि सायलीच्या हाती लागलाय.
tharla tar mag

tharla tar mag

esakal

Updated on

'ठरलं तर मग' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांना आपलंसं केलंय. ही मालिका गेली तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. त्यातही अर्जुन आणि सायली यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. गेल्या काही दिवसात या मालिकेचा टीआरपी कमी झाला होता. त्यामुळेच मेकर्सनी मालिकेत निरनिराळे ट्विस्ट आणायचं ठरवलं. मूळ मुद्द्यावरून भरकटलेली कथा पुन्हा एकदा ट्रॅकवर येणार आहे. यापूर्वी नागराजचे सगळे काळे कारनामे सगळ्यांसमोर आले होते. महिपतने मुलगी साक्षीला वाचवण्यासाठी नागराजच्या विरोधात साक्ष दिलेली. त्यामुळे ते दोघेही जेलमध्ये आहेत. आता मालिकेत आणखी एक ट्विस्ट येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com