
मनोज बाजपेयी यांची 'द फॅमिली मॅन' अॅक्शन, ड्रामा आणि विनोदाचं पॅकेज असणारी सीरिज आहे. ही सीरिज ओटीटीवरील सर्वात लोकप्रिय आणि हिट वेब सिरीजपैकी एक आहे. या स्पाय थ्रिलरच्या दोन सीझनने ओटीटीवर धुमाकूळ घातला होता. 'फॅमिली मॅन' चे दोन्ही सीझन ओटीटीवर प्रचंड गाजले आणि चाहते त्याच्या तिसऱ्या सीझनच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. अखेर, 'द फॅमिली मॅन ३' ची रिलीज डेट जाहीर झाली आहे.