
Entertainment News: मराठी सिनेसृष्टीत अनेक प्रयोग केले गेले. कधी त्यातले काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यात यशस्वी ठरले तर काही चित्रपट दणकून आपटले. मात्र ११ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने प्रेक्षकांना एक आगळीवेगळी लव्हस्टोरी दाखवली. या लव्हस्टोरीने प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं आणि बॉक्स ऑफसवर प्रचंड यश मिळवलं. हा चित्रपट होता. रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास'. या चित्रपटाने प्रेक्षकांना प्रेमाची भाषा नव्याने शिकवली. आता या चित्रपटाला ११ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अभिनीत प्रथमेश परब याने खास पोस्ट करत चाहत्यांचे आभार मानले आहेत.