
मराठी चित्रपट आणि टीव्ही दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी (५८) यांच्या घराच्या सहाव्या मजल्यावरील घरात ड्रेनेज पाईपच्या मदतीने चोर घुसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रात्रीच्या अंधारात सगळेजण झोपलेले असताना चोर टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये त्यांच्या इमारतीमधील सहाव्या मजल्यावर चढला आणि खिडकीमधून घरात घुसला. चोराच्या सर्व हालचाली या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्या आहेत.