
लोकप्रिय अभिनेते परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडल्यानंतर सोशल मीडियावर एकाच गोंधळ सुरू झालाय. परेश यांनी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आणि त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या. परेश यांनी चित्रपटात काम न करण्याचं ठोस कारणही सांगितलेलं नाही. केवळ आपल्याला ही भूमिका करायला कंटाळा आलाय असं त्यांनी सांगितलं होतं. दुसरीकडे परेश यांना मानधन कमी दिल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असं बोललं जातंय. याशिवाय अक्षय कुमारने त्यांच्यावर २५ कोटींचा खटला भरला आहे. अशातच आता 'हेरा फेरी ३' मधील बाबू भैया या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्याचं नाव आता चर्चेत आहे.