

swarajyarakshak sambhaji
ESAKAL
मराठी मालिका लोकप्रिय ठरतात त्या त्यांच्या सीनमुळे. उत्तम कलाकार, उत्तम लिखाण, उत्कृष्ट संवाद आणि शेवटी उत्तम दिग्दर्शन यांचा योग्य मेळ जुळून आला की एक उत्तम मालिका तयार होते. अशा अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी ठरल्या. अशीच्च एक मालिका म्हणजे 'स्वराज्यरक्षक संभाजी'. झी मराठीवरील या मालिकेत स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांचं आयुष्य दाखवण्यात आलं होतं. या मालिकेत अभिनेत्री पल्लवी वैद्य हिचा एक सीन होता ज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झाल्यानंतर पुतळा राणी सती जातात. या भूमिकेसाठी विशेषतः या सीनसाठी पल्लवीचं कौतुक झालं होतं. आता पल्लवीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तो सीन कसा शूट झाला याबद्दल सांगितलं आहे.