
मराठी सिनेक्षेत्र दिसतं तितकं सोपं नाही. बाहेरून झगमगणाऱ्या या क्षेत्रात प्रचंड मेहनतीची कास लागते. जिद्द लागते. त्यातही मालिकाविश्वातलं वातावरण तर खूप बिकट आहे. दररोज १२- १३ तासांचं शूटिंग, अपुरी झोप यासगळ्याबद्दल यापूर्वी अनेक कलाकार बोलले आहेत. मात्र आता एका अभिनेत्रीने या सगळ्याला कंटाळून मालिका न करण्याचा निर्णय घेतलाय. या अभिनेत्री आहेत दिग्गज दिवंगत अभिनेते निळू फुले यांची मुलगी गार्गी फुले. गार्गी यांनी अनेक नाटक आणि मालिकांमधून स्वतःची ओळख निर्माण केलीये. मात्र आता त्यांनी मालिका न करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचं कारणही त्यांनी सांगितलंय.