
१० वर्ष प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा लोकप्रिय शो 'चला हवा येऊ द्या' प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम होता. या कार्यक्रमातील सगळी पात्र, त्यातले विनोद प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, सागर कारंडे या कलाकारांनी या कार्यक्रमाला एका उंचीवर नेऊन ठेवलं. मात्र कमी टीआरपीमुळे या कार्यक्रमाने सगळ्यांचा निरोप घेतलेला. 'चला हवा येऊ द्या' चा नवीन सीझन कधी येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. आता अखेर ती प्रतीक्षा संपली आहे. हा लोकप्रिय शो पुन्हा एकदा नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.