
बागी ४ चित्रपटातील पहिलं गाणं ‘गुजारा’ नुकतंच प्रदर्शित झालं असून यात मिस युनिव्हर्स हरनाझ संधू हिचं बॉलीवूडमधील पदार्पण होत आहे.
या गाण्यात हरनाझसोबत टायगर श्रॉफची जोडी प्रथमच पडद्यावर झळकली असून, प्रेक्षकांकडून त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जोश बरार यांच्या आवाजातलं हे गाणं रोमँटिक व सोलफुल धूनसह सादर करण्यात आलं असून, बाइक एन्ट्री, प्रार्थना, समुद्रकिनारा अशा विविध दृश्यांमुळे गाण्याचे व्हिज्युअल्स प्रेक्षकांना भावत आहेत.