'तो, ती आणि फुजी'च्या प्रदर्शनाची तारीख ठरली; ठरणार जपानमधील चित्रीकरण असलेला पहिलाच मराठी चित्रपट; कुठे पाहाल?

TO TI ANI FUJI OTT RELEASE: सात वर्षांच्या दुराव्यानंतर जपानमध्ये अचानक भेटलेल्या एका जुन्या जोडप्याची ही गोष्ट, प्रेक्षकांना प्रेम, विरह आणि 'दुसरी संधी' यावर विचार करायला भाग पाडते.
TO TI ANI FUJI

TO TI ANI FUJI

ESAKAL

Updated on

मराठी चित्रपटसृष्टीने आता जागतिक स्तरावर झेप घेतली असून, भारत आणि जपानमध्ये चित्रित झालेला ‘तो, ती आणि फुजी’ हा बहुप्रतीक्षित रोमँटिक चित्रपट १० एप्रिल २०२६ रोजी थेट सोनी लिव्ह (Sony LIV) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाने प्लॅटून वनच्या या चित्रपटाचे जागतिक हक्क संपादन केले असून, हा चित्रपट मराठीसह हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळम अशा पाच विविध भाषांमध्ये प्रेक्षकांसाठी उपलब्ध असेल. जपानच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर उलगडणारा हा चित्रपट केवळ एका ठिकाणाचे चित्रण नसून, पात्रांच्या मनातील भावनिक आंदोलनांचे प्रतिबिंब मांडणारा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील मराठी प्रकल्प ठरला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com