देवाला पाठवलेलं पत्र देवाच्या घरी जाणार! 'मुक्काम पोस्ट देवाचं घर' चित्रपटाचा सुंदर ट्रेलर प्रदर्शित

Mukkam Post Devach Ghar Trailer Release: उत्तम कथानकाला रंजकतेची जोड असलेल्या "मुक्काम पोस्ट देवाचं घर" चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय.
mukkam post devacha ghar
mukkam post devacha gharesakal
Updated on

आपण पाठवलेलं पत्र अमेरिकेला पोहोचतं, तर देवाच्या घरी नक्की पोहोचेल असं वाटणाऱ्या एका लहान निरागस मुलीचा देवाच्या घराचा शोध "मुक्काम पोस्ट देवाचं घर" या चित्रपटातून उलगडणार आहे. हृदयस्पर्शी आणि मनोरंजक कथानक असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच नुकताच सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांच्या मुख्य उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आवर्जून उपस्थित होते. येत्या ३१ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com