राजीव गांधींच्या हत्येचं रहस्य उलगडणार ‘द हंट: द राजीव गांधी हत्याकांड'; ट्रेलर प्रदर्शित, कधी कुठे पाहाल?

The Hunt Rajiv Gandhi Assasination Case On Ott: राजीव गांधी यांच्या हत्येशी संबंधित काही मोठी गुपिते आता उघड होणार आहेत. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून ही सीरिज चर्चेचा विषय बनली आहे.
the hunt
the huntesakal
Updated on

राजीव गांधी हे भारताचे सर्वात तरुण पहिले पंतप्रधान बनले. वयाच्या ४० व्या वर्षी त्यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले. भारताच्या इतिहासात इंदिरा गांधी यांचे पुत्र राजीव यांचा उल्लेख आहे. त्यांच्या हत्येबद्दल अनेक रहस्ये आहेत, ज्यांबद्दल लोकांना अजूनही माहिती नाही. याच विषयावर आता 'द हंट - द राजीव गांधी मर्डर केस' नावाची एक सीरिज ओटीटीवर येत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून ती चर्चेत आली आहे आणि ओटीटी प्रेमींनी त्याशी संबंधित माहिती गोळा करण्यास सुरुवात केलीये.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com