
अजूनही आपली समाजात तृतीयपंथींना हीन दर्जाची वागणूक दिली जाते. त्यांच्यातील काहीजण शिकून अगदी ऑफिसर बनले आहेत. मात्र अजूनही समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मुळीच बदललेला नाही. अजूनही त्यांना हिणवलं जातं. मात्र एका मराठी अभिनेत्याने त्यांना राहायला थेट स्वतःच्या घरात जागा दिली होती. जेव्हा अभिनेता घरी नसायचा तेव्हा त्याच्या घरात ते राहायचे. एका मुलाखतीत त्याने याबद्दल सांगितलं आहे. हा अभिनेता आहे प्रियदर्शन जाधव.