
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली, समर्थ रामदास स्वामींनी रचलेली 'सुखकर्ता दुःखहर्ता' ही गणपतीची आरती आता नव्या रूपात ऐकायला मिळणार आहे. भारतातील पहिला AI बँड 'त्रिलोक' यांनी या आरतीला आधुनिक संगीताची जोड दिली आहे. सतराव्या शतकात रचलेली ही आरती आजही घराघरात, गणेशोत्सवाच्या मंडपांमध्ये आणि विसर्जनाच्या जल्लोषात्मक मिरवणुकीत एकमुखाने घुमते.