

TULA JAPNAR AAHE
ESAKAL
छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत जवळच्या असतात. या मालिकेनमधील कलाकारही त्यांना आपल्याच घरातील व्यक्ती असल्यासारखं वाटतं. मात्र एखाद्या मालिकेतील एखादा कलाकार अचानक गायब होतो तेव्हा मात्र प्रेक्षकांना ती गोष्ट खटकते. असंच घडलंय झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'तुला जपणार आहे' मध्ये. गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील एक कलाकार गायब आहे. गेले कित्येक दिवस मालिकेतील मुख्य अभिनेत्री मालिकेत दिसलेली नाही आणि आता प्रेक्षक तिच्याबद्दल विचारणा करत आहेत. आता या अभिनेत्रीऐवजी दुसरी अभिनेत्री येणार असल्याचं बोललं जातंय.