अपूर्ण प्रेम, पुर्नभेट आणि भावनांची सुंदर गुंफण, कसा आहे 'तुला पाहता' सिनेमा?

TULA PAHATA MOVIE REVIEW: 'तुला पाहता' हा दोन पिढ्यांतील प्रेम, अपूर्ण नातं आणि पुनर्भेट यांची भावनिक गुंफण असलेला मराठी चित्रपट आहे.
TULA PAHATA MOVIE REVIEW

TULA PAHATA MOVIE REVIEW

esakal

Updated on

TWO GENERATIONS LOVE STORY MARATHI MOVIE: प्रेम ही एक हळवी भावना आहे. ते कधी कुणावर कसे जडेल ते सांगता येत नाही. कारण प्रेम हे काही शब्दांनी व्यक्त करण्यासारखी बाब नाही तर ती निसर्गदत्त देणगी आहे आणि प्रत्येक नात्यामध्ये प्रेमाची ही भावना दडलेली आहे. त्यातच एखाद्या तरुण किंवा तरुणीचे पहिले प्रेम असेल तर...त्या पहिल्या प्रेमाची भावना काहीशी निराळीच असते. ते नजरेमध्ये किंवा हृदयामध्ये अव्यक्त भावनांनी भरलेले असते. सगळ्या बंधनांच्या पलीकडे ते असते. ते केवळ दोन व्यक्तीमधील आकर्षण नसते तर ते दोघांमधील आपुलकी, जिव्हाळा आणि एकमेकांवरील विश्वासाचे ते नाते असते. पण प्रत्येक पहिल्या प्रेमाचा शेवट 'शुभमंगल सावधान'नेच होतो असं नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com