
झी मराठीवरील एकापाठोपाठ २ मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका बंद होणार हे समजताच प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. ही मालिका बंद करू नका असं म्हणत चाहत्यांनी वहिनीला आवाहन केलं होतं. मात्र त्याच्यापाठोपाठ आणखी एका मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. ही मालिका बंद होणार असल्याची माहिती मालिकेतील भुवनेश्वरी म्हणजेच अभिनेत्री कविता मेढेकर यांनी दिली होती. आता मालिका संपल्यावर अभिनेत्री शिवानी रांगोळे म्हणजेच मास्तरीणबाईंनी एक पोस्ट केली आहे.