
सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये लग्नाचे वारे वाहत आहेत. त्यात गेल्या महिन्याभरात अनेक मराठी कलाकार विवाहबंधनात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वीच रेश्मा शिंदे देखील लग्नबंधनात अडकली. त्यापूर्वी महाराष्ट्राची हास्यजत्रामधील पृथ्वीक प्रताप लग्नबंधनात अडकला. लवकरच अनेक मराठी कलाकार बोहोल्यावर चढणार आहेत. त्यापूर्वी आणखी एका अभिनेत्रीचं शुभमंगल सावधान झालं आहे. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' या मालिकेतील चंचला म्हणजेच अभिनेत्री विरीशा विवाहबद्ध झाली आहे.