

tumbadchi manjula box office
esakal
Tumbadchi Manjula Movie: गेल्या काही महिन्यात अनेक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यातल्या काहींनी बॉक्स ऑफिसवर राज्य केलं. 'राजा शिवाजी' आणि 'देऊळ बंद' या चित्रपटाच्या पाठोपाठ आणखी एका चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलंय. हा चित्रपट म्हणजे 'तुंबाडची मंजुळा' नुकताच प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चर्चेत आहे. ५ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या हॉरर कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातलीये. या चित्रपटाची दमदार स्टारकास्ट आणि कथा यांच्या जोरावर या चित्रपटाने पहिल्या चार दिवसात कोट्यवधींची कमाई केलीये.