तुंबाड २' मध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी! आधी मालिका गाजवल्या आता चित्रपट, कोण आहे ती? पहिला प्रोमो समोर

TUMBAAD 2 ACTRESS NAME REVEALS: आधी छोटा पडदा गाजवणारी ही लोकप्रिय अभिनेत्री आता 'तुंबाड २' सारख्या मोठ्या प्रोजेक्टचा भाग झाली आहे. कोण आहे ती?
ANIT DATE IN TUMBBAD

ANIT DATE IN TUMBBAD

ESAKAL

Updated on

'तुंबाड' हा बॉलिवूडमधला एक अतिशय सुंदर आणि तितकाच थरारक चित्रपट आहे. राही अनिल बर्वे दिग्दर्शित 'तुंबाड'ने प्रेक्षकांची मनं जिंकली. जेव्हा 'तुंबाड' प्रदर्शित झाला होता तेव्हा या चित्रपटाला प्रेक्षकांचा तितकासा प्रतिसाद लाभला नव्हता. मात्र नंतर या चित्रपटाला माऊथ पब्लिसिटी मिळाली. त्यानंतर जेव्हा गेल्या वर्षी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित केला गेला तेव्हा त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर निर्मात्यांनी 'तुंबाड २' ची घोषणा केली होती. आता अखेर या चित्रपटाचा पहिला प्रोमो समोर आलाय. जो पाहून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com