Tu Bhetashi Navyane: वर्षभराने छोट्या पडद्यावर परतली 'ही' लोकप्रिय अभिनेत्री; सुबोध भावेच्या मालिकेत साकारणार खलनायिका

Actress Priya Marathe Entry In Tu Bhetashi Navyane: लोकप्रिय अभिनेत्रीची आता छोट्या पडद्यावर पुन्हा एंट्री झाली आहे.
priya marathe
priya marathesakal

सध्या विविध चॅनेल्सवर विविध धाटणीचे विषय पाहायला मिळतात. यातील नायक-नायिका तर चाहत्यांच्या आवडीच्या असतातच पण त्याचबरोबर प्रेक्षकांना खलनायकांच्या भूमिकाही आवडतात. अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. वर्षभरापूर्वीच तिने छोट्या पडद्याचा निरोप घेतला होता. आता ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाली आहे. ही अभिनेत्री आहे प्रिया मराठे. प्रिया आता सुबोध भावे याच्या 'तू भेटशी नव्याने या मालिकेत दिसणार आहे.

अभिनेत्री प्रिया मराठेने अनेक गाजलेल्या मराठी, हिंदी मालिकांमध्ये काम केलं. प्रियाने आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. ती यापूर्वी स्टार प्रवाहज वाहिनीवरील 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत दिसली होती. मात्र तिने वर्षभरापूर्वी काही वैयक्तिक कारणाने या मालिकेचा निरोप घेतला. आता लवकरच प्रिया सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत झळकणार आहे. या मालिकेत प्रिया मराठे खलनायिका साकारणार आहे. ‘रागिणी अग्निहोत्री’ असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. प्राध्यापिका असणारी रागिणी अभिमन्यू राजेशिर्केच्या प्रेमात पडते आणि त्याला मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार असणारी रागिणी काय आणि कशाप्रकारे षडयंत्र रचते ? ते मालिकेत पहाता येणार आहे.

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेत काम करायला, त्यातही निगेटिव्ह रोल करायला प्रिया खूपच उत्सुक आहे. या मालिकेतील आपल्या भूमिकेबद्दल प्रिया सांगते, 'जर त्या भूमिकेचं कथेतील महत्त्व जास्त असेल तर ती भूमिका करणं मला आवडतं. माझ्यासाठी त्या भूमिकेचं कथेतील स्थान जास्त महत्त्वाचं असतं, जेणेकरून मला तिथे अभिनयासाठी जास्त चांगला वाव मिळेल. भूमिका स्वीकारताना ती भूमिका काय आणि किती महत्त्वाची आहे याकडे माझं लक्ष असते. मालिकेत मी साकारत असलेली भूमिका खूप अनपेक्षित वळण घेऊन येणार आहे. या भूमिकेबद्दलची हीच गोष्ट मला जास्त आवडली.'

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेच्या घोषणेपासूनच ही एआय मालिका नेमकी कशी असेल? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. मालिका विश्वात एआयवर आधारित असलेली ही जगभरातली पहिलीच मालिका आहे. ही मालिका येत्या ८ जुलैपासून सोनी मराठी वाहिनीवर रोज रात्री ९.००वा. आपल्या भेटीला येणार आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत.

priya marathe
Anil Kapoor: बेर्डेजी म्हणजे खूप मस्त माणूस... अनिल कपूर यांनी सांगितली लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण, म्हणाले- त्यांच्यामुळे मी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com