
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या आई झाली आहे. तिने २९ नोव्हेंबर रोजी जुळ्या मुलांना जन्म दिलाय. तिने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिलीये. तिने ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीये. तिच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म झाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. श्रद्धाने तिच्या नवजात मुलांसोबतचा एक व्हिडिओ शेअर करत त्यांची झलक दाखवलीये. हा व्हिडिओ पाहून चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.