

UDAY SAMANT WIFE CONTRIVERSY
ESAKAL
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून दरवर्षी बालनाट्य स्पर्धा आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. मात्र यंदा होणारी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. यावर्षी यावर्षी या स्पर्धेची जबाबदारी बालरंगभूमी परिषद या खासगी संस्थेला देण्यात आली आहे. बालरंगभूमी परिषद या खासगी संस्थेकडून शासकीय स्पर्धा 'हायजॅक' केल्या जात आहेत आणि हे सर्व राजकीय दबावाखाली होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. बालरंगभूमी परिषद ही संस्था दुसऱ्या कुणाची नसून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पत्नीची म्हणजेच अभिनेत्री नीलम शिर्के सामंत हिची आहे.