माहेरी साधी फोडणी दिली नाही, सासरी गेल्यावर सगळे पदार्थ... मुग्धा वैशंपायनने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण

Mugdha Vaishampayan Marriage Life | Singer Reveals Her Cooking Journey After Marriage : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय गायिका मुग्धा वैशंपायन हिने तिच्या लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल काही खास गोष्टी सांगितल्यात.
mugdha vaishmpayan

mugdha vaishmpayan

esakal

Updated on: 

छोट्या पडद्यावरील प्रचंड गाजलेला कार्यक्रम 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'ने महाराष्ट्राला पाच अनमोल हिरे दिले. यातलीच एक सुंदर गाणारी आणि प्रेक्षकांची आवडती गायिका म्हणजे मुग्धा वैशंपायन. तिने आपल्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. तिने याच पंचरत्नांपैकी एक असलेला प्रथमेश लघाटे याच्याशी लग्न केलं. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे गायनाचे कार्यक्रम, परदेश दौरे आणि वैयक्तिक आयुष्यातील इतर गोष्टीही ती चाहत्यांसोबत शेअर करते. त्यातही खासकरून सासरच्या घराचे तिचे व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतात. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुग्धाने तिला लग्नाआधी मुळीच स्वयंपाक बनवता येत नव्हता असं म्हटलंय. मात्र सासरी आल्यावर ती हे सगळं शिकली असं तिने सांगितलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com