
‘ऑगस्ट’ महिना म्हणजे पावसाळ्याचा अखेरचा सडा, सणांची चाहूल आणि गणरायाच्या आगमनाची उत्सुकता! अगदी याच जल्लोषात अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवरही सुरू होतोय धमाकेदार कंटेंटचा उत्सव. या महिन्यात प्रत्येक शुक्रवार तुमच्यासाठी येणार आहेत मराठमोळे सुपरहिट सिनेमे, धमाल वेब सिरीज आणि साऊथ, बांग्लामधील ब्लॉकबस्टर हिट्स तेही तुमच्या मायबोली मराठीत. आता गणपतीच्या स्वागताची तयारी करताना तुमचं मनोरंजनही होईल एकदम झकास!